Saturday, 24 December 2011

निवडणुकीत तरुणांचा सहभाग


निवडणुकीच्या प्रक्रियेत युवकांनी अग्रेसर रहावे, अशी अपेक्षा मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केली. लोक भयमुक्त होऊन बोलतील आणि सरकार त्यांच्या म्हणण्यानुसार कृती करेल तेव्हा खरी लोकशाही अस्तित्वात येईल, निवडणुका हा जबाबदार प्रतिनिधी निवडण्याचा मान्यताप्राप्त आणि क्रांतिकारक मार्ग आहे. त्यात लोकांच्या नागरी आणि राजकीय हक्काचे व्यासपीठ आहे, मतदानाचा हक्क सर्वोच्च आहे. भारतीय लोकशाहीला स्वतःची ओळख आणि इतिहास आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि घटनेच्या शिल्पकारांनी याचा पाया घातला आहे. संसद, न्यायसंस्था, राजकीय पक्ष आणि माध्यमे ही लोकशाहीव्यवस्थेचे अविभाज्य घटक आहेत. याहून श्रेष्ठ भारतीय जनताच आहे. लोकशाही रुजवण्यात निवडणूक आयोगाचे योगदान मोलाचे आहे.

-Anil Gaikwad

न्यायालयांची गरज


राज्यभरात आणखी आठ जिल्हा न्यायालयांसह 105 तालुका न्यायालयांची गरज असून तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा निधी नवीन न्यायालये न्यायाधीशांच्या निवासस्थानांसाठी आवश्यक आहे. अनेक न्यायालयांमध्ये प्राथमिक सुविधाही नसून या सुविधा पुरविण्यात आणखी पंधरा वर्षे लागण्याची भीतीही उच्च न्यायालयाला दिलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.पायाभूत सुविधेसाठी किमान दोन हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे, सध्याच्या वार्षिक 110 कोटी रुपयांच्या तुलनेत या सुविधा पूर्ण होण्यासाठी आणखी किमान पंधरा वर्षे लागतील, अशी शक्यता रजिस्ट्रार जनरलनी मुख्य न्यायमूर्तींना दिलेल्या अहवालात व्यक्त केली आहे. जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये, कुटुंब न्यायालये, महानगर दंडाधिकारी न्यायालये आणि ग्राम न्यायालयांच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे.


Anil Gaikwad

Friday, 23 December 2011

वधूवर मेळावा

आपला मल्हारी वृत्तपत्राच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त मल्हारी वधूवर सूचक केंद्रातर्फे हिंदू खाटिक समाजातील वधुवरांचा परिचय मेळावा रविवार २५ डिसेंबर ला आयोजित केला आहे .
ठिकाण याज्ञावाल्क्या हाल , सहजानंद चौक , आग्रा रोड कल्याण पश्चिम . वेळ सायंकाळी वाजता . इच्छुक समाज बांधवांनी लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश घोणे ९३२१५४८४१४
रत्नाकर कांबळे ९२२३२६६१५८
महेंद्र कांबळे ९२२११२३९४१

Sunday, 18 December 2011

सामुदाईक विवाह सोहळा

अकलूज शहर युवक हिंदू खाटिक समाज संघटना आयोजित .हिंदू खाटिक समाजाचा सामुदाईक विवाह सोहळा . सर्व समाज बांधवाना आग्रहाचे निमंत्रण

Saturday, 17 December 2011

समाज भूषण - सौ. स्वातीताई झुटे


भगूर नगर पालिका निवडणूक - २०११ मध्ये आपल्या समाजातील सौ. स्वातीताई झुटे या बहु मताने निवडून आल्याने त्यांना सर्वे समाज बांधवान कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेछा !

समाज भूषण - श्री. गणेश निकुडे

जेजुरी नगर पालिका निवडणूक - २०११ मध्ये आपल्या समाजातील श्री. गणेश निकुडे बहु मताने निवडून आल्याने त्यांना सर्वे समाज बांधवान कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेछा !

समाज भूषण - सौ. मंगलताई अनिल जाधव

सिन्नर नगरपालिका निवडणूक २०११ -१२. मध्ये आपल्या समाजाच्या सौ. मंगलताई अनिल जाधव या बहुमताने निवडून आल्या त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी सर्व समाज बांधवांकडून हार्दिक शुभेच्या


समाज भूषण - सौ. रेखा सुनील कांबळे

गिरीस्थान पांचगणी नगर पालिका निवडणूक - २०११ मध्ये आपल्या समाजातील सौ. रेखा सुनील कांबळे ह्या बहु मताने निवडून आल्याने त्यांना सर्वे समाज बांधवान कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेछा !


समाज भूषण - सौ. सुरेखा (आक्का) कांबळे

महाड नगर पालिका निवडणूक - २०११ मध्ये आपल्या समाजातील सौ. सुरेखा (आक्का) कांबळे ह्या बहु मताने निवडून आल्याने त्यांना सर्वे समाज बांधवान कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेछा !


Nutan Gaikwad यांना हिंदू खाटिक समाज बांधवांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या !!


Nutan Gaikwad



Name : Nutan Gaikwad
D.O.B : 17/12/
Facebook Profile :
http://www.facebook.com/profile.php?id=100001912425524


"Wish you a very happy birthday,
May life lead you 2 great happiness,
success and hope dat all your wishes comes true!
enjoy your day."


!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या !!

Friday, 16 December 2011

Rushi Kamble यांना हिंदू खाटिक समाज बांधवांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या !!


Rushi Kamble


Name : Rushi Kamble
D.O.B : 17/12/
Facebook Profile :
http://www.facebook.com/profile.php?id=100002303977191&ref=pb



"Wish you a very happy birthday,
May life lead you 2 great happiness,
success and hope dat all your wishes comes true!
enjoy your day."


!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या !!

Thursday, 15 December 2011

आज एक नात ... हळुवार उलगडत होत


अर्धा तास अगोदरच मी स्टेशनवर होतो
गर्दीत त्या साऱ्या तो चेहरा शोधत होतो
ती सुद्धा आली अगदी ठरल्याप्रमाणे
जवळ ती असण्याची मग सवय करीत होतो

आज सार काही ... पहिल्यांदाच घडत होत
आज एक नात ... हळुवार उलगडत होत

ती आली पुढे थोडी लाजत थोडी बुजत
ती आली पुढे थोडी पदर जरा सावरत
ती आली पुढे थोडी नजर हळूच चोरत
ती आली पुढे थोडी गालात गोड हसत

आज सार काही ... थांबत बावरत होत
आज एक नात ... हळुवार उलगडत होत

नंतर तिच्या ओठांतला शब्द कळला मला
नंतर तिच्या डोळ्यांतला भाव कळला मला
नंतर तिच्या हाताचा स्पर्श झाला मला
नंतर तिच्या स्पर्शाचा कैफ चढला मला

आज सार काही ... धुंद गंधित होत
आज एक नात ... हळुवार उलगडत होत

आज कळल मला ती जवळ म्हणजे काय
आज कळल मला ती दूर म्हणजे काय
आज कळल मला हे बंध म्हणजे काय
आज कळल मला ते प्रेम म्हणजे काय

आज सार काही ... पुन्हा पुन्हा हव होत
आज एक नात ... हळुवार उलगडत होत

लग्ना अगोदर ती पहिली भेट होती
Engagement
ची हुरहूर अजून मनात होती
थोडी भीती थोडी अनाम ओढ होती
अनोळखी त्या सांजेची नवी ओळख होती

आज सार काही ... नव नव जग होत
आज एक नात ... हळुवार उलगडत होत

... रुपेश सावंत

© 2011 Lane 46 |  ©Blogger templates by Ourblogtemplates.com| Please come again

Back to TOP