निवडणुकीच्या प्रक्रियेत युवकांनी अग्रेसर रहावे, अशी अपेक्षा मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केली. लोक भयमुक्त होऊन बोलतील आणि सरकार त्यांच्या म्हणण्यानुसार कृती करेल तेव्हा खरी लोकशाही अस्तित्वात येईल, निवडणुका हा जबाबदार प्रतिनिधी निवडण्याचा मान्यताप्राप्त आणि क्रांतिकारक मार्ग आहे. त्यात लोकांच्या नागरी आणि राजकीय हक्काचे व्यासपीठ आहे, मतदानाचा हक्क सर्वोच्च आहे. भारतीय लोकशाहीला स्वतःची ओळख आणि इतिहास आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि घटनेच्या शिल्पकारांनी याचा पाया घातला आहे. संसद, न्यायसंस्था, राजकीय पक्ष आणि माध्यमे ही लोकशाहीव्यवस्थेचे अविभाज्य घटक आहेत. याहून श्रेष्ठ भारतीय जनताच आहे. लोकशाही रुजवण्यात निवडणूक आयोगाचे योगदान मोलाचे आहे.
-Anil Gaikwad