Monday, 14 May 2012

शिवपुत्र संभाजी राजे


आज शिवपुत्र संभाजी राजे यांची ३५५ वी जयंती त्यांच्या जीवनावरील विश्वास पाटील यांनी लिहिलेले संभाजी प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे नितांत सुंदर पुस्तक .................
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी, कवी-राज्यकर्त्यांची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!
आजचे अग्रगण्य रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांना सह्याद्रीच्या निबिड दर्याखोर्यांनी, सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथराक, वादळी, पण वास्तव गाथा!!

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा आपल्या तलवारीच्या बळावर संभाजी महाराजांनी विस्तार केला. स्वराज्यातला एकही किल्ला गमावला नाही की आरमारातले एकही जहाज बुडू दिले नाही. पण त्याच वेळी कावेरीच्या महापात्रात घोडी घातली. कर्नाटकातील राज्य दुप्पट केले. त्रिचनापल्लीच्या पाषाणकोटाला सुरुंग लावले. जंजिर्याच्या सिद्दीला जेरीस आणले. पोर्तुगीज व्हॉइसरॉयला होडक्यात बसून पळायला लावले. त्यांचे तीन चतुर्थांश राज्य स्वराज्याला जोडले. व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांच्या वखारींची लांबी-रुंदी किती असावी, याचे निर्बंध प्रथम संभाजीराजांनी घातले. वसीपासून पणजीपर्यंत किनारपट्टीवर जरब बसवली. मुख्य म्हणजे पाच लाख सैन्यासह तळ ठोकून असलेल्या औरंगजेबाशी आठ वर्षांहून अधिक काळ अनेक आघाडयांवर त्यांनी लढा दिला. छत्रपती संभाजीराजांचे योद्धेपण अशा अनेक मोहिमांमधून सिद्ध झाले आहे. ही वीरगाथा विश्वास पाटील यांनी 'संभाजी' या कादंबरीतून गाईली आहे.

ज्याच्याकडे शिक्षा करण्याचे अधिकार असतात, त्याच्याकडे क्षमा करण्याएवढे उदार अंत:करण असावे लागते. संभाजीराजांपाशी अशी उदारता निश्चित होती. संभाजीराजे छत्रपती झाल्यानंतर हिर्यांनी भरलेले दोन पेटारे चोरताना हिरोजीबाबा फर्जंद पकडले गेले. शिवाजीमहाराजांनी आग्य्राहून सुटका करून घेताना हिरोजीबाबांचे साह्य घेतले होते. महाराजांच्या जागी हिरोजीबाबाच आजारी असल्याचे सोंग करून पडलेले होते. हे जाणून संभाजीराजे हिरोजीबाबांना म्हणाले, ''फर्जंदकाका, नुसती इच्छा प्रदर्शित केली असती तरी आपल्या पायावर अख्खा खजिना रिता केला असता! असे चोरचिलटांचे मार्ग कशासाठी अवलंबिलेत?'' त्यांना या गुन्ह्याबद्दल संभाजीराजांनी उदार अंत:करणाने माफ केले.

अष्टप्रधानांनाही त्यांनी एकदा माफ केलेले दिसते. स्वराज्याच्या उभारणीत छत्रपती शिवरायांबरोबर अष्टप्रधानांनी कष्ट झेलले होते, पण नंतरच्या काळात थोडी स्थिरता आल्यावर त्यांचा स्वार्थ जागा झाला. साहजिकच संभाजीराजांचा स्पष्टवक्तेपणा त्यांना रुचत नव्हता. अष्टप्रधानांचा इंग्रजी व्यापार्यांकडून बक्षिसी मिळवण्याचा प्रयत्न युवराज संभाजी यशस्वी होऊ देत नसत. त्यामुळेच संभाजीराजांना छत्रपती होण्यापासून दूर ठेवण्याचा कट त्यांनी रचला होता. सेनापती हंबीरराव मोहिते यांनी आपल्या सख्ख्या भाच्याला- राजाराम राजांना- छत्रपती करण्याएएवजी संभाजीराजांना छत्रपती करण्याचा कौल दिला आणि कट उधळला. अष्टप्रधानांनी औरंगजेबाला निष्ठा वाहिली होती. पण संभाजीराजांनी एकदा त्यांना माफ केले. कारभार्यांनी पुन्हा गद्दारी केल्यानंतर त्यांना हत्तीच्या पायी दिले. एकाच वेळी मृदू कठोर अशी दोन रूपे संभाजीराजांमध्ये वसत होती, याची अनेक उदाहरणे समोर येतात.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभर-सव्वाशे वर्षांनी लिहिलेल्या बखरींमध्ये त्यांच्याविषयी एकांगी विपर्यस्त चित्रण केलेले आढळते; तसेच कनोजी कलुषाविषयीही चुकीचे लिहिलेले आढळते. कनोजच्या या ब्राह्मणाने संभाजीराजांना काव्यशास्त्रनपुण केले होते. रणांगणात तलवार गाजविली होती. रायगडावर आक्रमण करून आलेल्या औरंगजेबाच्या सैन्याला पळताभुई थोडी केली होती. कलुषाला मोगलांनी हालहाल करून मारले. तापलेली सळी डोळ्यात खुपसली गेल्यानंतरही हा कवी हिमतीने काव्यगायन करीत होता. म्हणून त्याची जीभ कापण्यात आली. या लढवय्याचे मर्मग्राही चित्रण या कादंबरीत येते.

येसूबाईच्या हाती राज्यकारभार सोपविणारा आणि स्वत: रणांगण गाजवणारा वीर संभाजीराजा येथे भेटतो. दुष्काळात दोन वर्षे किल्ल्यांवर रयतेला पुरेशी रसद पुरविणारा जाणता राजा येथे दिसतो. नद्यांवर धरणे बांधणारा राजा समोर येतो. मित्रासाठी लढणारा कलुषा भेटतो. स्वराज्यावर प्रेम करणारी गोदू मनाला चटका लावून जाते. 'संभाजी' ही कादंबरी म्हणजे एका शूराचा पोवाडाच आहे

Tuesday, 1 May 2012

महाराष्ट्र दिन

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे

१] सिताराम बनाजी पवार

२] जोसेफ डेव्हिड पेजारकर

३] चिमणलाल डी. शेठ

४] भास्कर नारायण कामतेकर

५] रामचंद्र सेवाराम

६] शंकर खोटे

७] धर्माजी गंगाराम नागवेकर

८] रामचंद्र लक्ष्मण जाधव

९] के. जे. झेवियर

१०] पी. एस. जॉन

११] शरद जी. वाणी

१२] वेदीसिंग

१३] रामचंद्र भाटीया

१४] गंगाराम गुणाजी

१५] गजानन ऊर्फ बंडू गोखले

१६] निवृत्ती विठोबा मोरे

१७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर

१८] बालप्पा मुतण्णा कामाठी

१९] धोंडू लक्ष्मण पारडूले

२०] भाऊ सखाराम कदम

२१] यशवंत बाबाजी भगत

२२] गोविंद बाबूराव जोगल

२३] पांडूरंग धोंडू धाडवे

२४] गोपाळ चिमाजी कोरडे

२५] पांडूरंग बाबाजी जाधव

२६] बाबू हरी दाते

२७] अनुप माहावीर

२८] विनायक पांचाळ

२९] सिताराम गणपत म्हादे

३०] सुभाष भिवा बोरकर

३१] गणपत रामा तानकर

३२] सिताराम गयादीन

३३] गोरखनाथ रावजी जगताप

३४] महमद अली

३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे

३६] देवाजी सखाराम पाटील

३७] शामलाल जेठानंद

३८] सदाशिव महादेव भोसले

३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे

४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर

४१] भिकाजी बाबू बांबरकर

४२] सखाराम श्रीपत ढमाले

४३] नरेंद्र नारायण प्रधान

४४] शंकर गोपाल कुष्टे

४५] दत्ताराम कृष्णा सावंत

४६] बबन बापू भरगुडे

४७] विष्णू सखाराम बने

४८] सिताराम धोंडू राडये

४९] तुकाराम धोंडू शिंदे

५०] विठ्ठल गंगाराम मोरे

५१] रामा लखन विंदा

५२] एडवीन आमब्रोझ साळवी

५३] बाबा महादू सावंत

५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर

५५] विठ्ठल दौलत साळुंखे

५६] रामनाथ पांडूरंग अमृते

५७] परशुराम अंबाजी देसाई

५८] घनश्याम बाबू कोलार

५९] धोंडू रामकृष्ण सुतार

६०] मुनीमजी बलदेव पांडे

६१] मारुती विठोबा म्हस्के

६२] भाऊ कोंडीबा भास्कर

६३] धोंडो राघो पुजारी

६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग

६५] पांडू माहादू अवरीरकर

६६] शंकर विठोबा राणे

६७] विजयकुमार सदाशिव भडेकर

६८] कृष्णाजी गणू शिंदे

६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले

७०] धोंडू भागू जाधव

७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे

७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर

७३] करपैया किरमल देवेंद्र

७४] चुलाराम मुंबराज

७५] बालमोहन

७६] अनंता

७७] गंगाराम विष्णू गुरव

७८] रत्नु गोंदिवरे

७९] सय्यद कासम

८०] भिकाजी दाजी

८१] अनंत गोलतकर

८२] किसन वीरकर

८३] सुखलाल रामलाल बंसकर

८४] पांडूरंग विष्णू वाळके

८५] फुलवरी मगरु

८६] गुलाब कृष्णा खवळे

८७] बाबूराव देवदास पाटील

८८] लक्ष्मण नरहरी थोरात

८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान

९०] गणपत रामा भुते

९१] मुनशी वझीऱअली

९२] दौलतराम मथुरादास

९३] विठ्ठल नारायण चव्हाण

९४] देवजी शिवन राठोड

९५] रावजीभाई डोसाभाई पटेल

९६] होरमसजी करसेटजी

९७] गिरधर हेमचंद लोहार

९८] सत्तू खंडू वाईकर

९९] गणपत श्रीधर जोशी

१००] माधव राजाराम तुरे(बेलदार)

१०१] मारुती बेन्नाळकर

१०२] मधूकर बापू बांदेकर

१०३] लक्ष्मण गोविंद गावडे

१०४] महादेव बारीगडी.

१०५] कमलाबाई मोहिते

१०६] सिताराम दुलाजी घाडीगांवकर


ह्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम !!!

सर्व समाज बांधवाना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्या

महाराष्ट्र दिन


सर्व समाज बांधवाना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्या

Saturday, 28 April 2012

बृहन्मुंबई हिंदू खाटिक समाज संघटना ४ था राज्यस्तरीय वधू- वर, पालक परिचय मेळावा

बृहन्मुंबई हिंदू खाटिक समाज संघटना ४ था राज्यस्तरीय वधू- वर, पालक परिचय मेळावा

वेळ : मंगळवार दि. १ मे २०१२ (महाराष्ट्र दिन} रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वा. पर्यंत स्थळ :- संत ध्ण्यानेश्वर सभागृह , केदारनाथ मंदिरा शेजारी , नेहरू नगर कुर्ला (पूर्व) मुंबई २४. समाज बांधवानो महाराष्ट्र दिनाच्या १ मे च्या सुमुहूर्तावर चौथा राज्यस्तरीय वधू- वर , पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे . तरी सर्व समाज बांधवाना या पत्राद्वारे विनंती करण्यात येते कि , त्या दिवशी आपण आपल्या वधू - वरांना तसेच आपल्या नातेवाईकांच्या इच्छुक वधू- वरांना दोन पासपोर्ट साईज फोटोसह सोबत आणून या राज्य स्तरीय वधू-वर, पालक परिचय मेळाव्यास उपस्थित राहून एका अत्यंत चांगल्या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे हि विनंती . अध्यक्ष श्री . राजेश हिराजी फिस्के मो. ९८७०१३७०४८.

Saturday, 31 March 2012


जय श्री राम ......रामनवमीच्या सर्व समाज बांधवाना हार्दिक शुभेच्या

Friday, 3 February 2012

क्रांती स्वातंत्र्याची



३ फेब्रुवारी १८३२
हुतात्मा क्रांतिवीर उमाजी नाईक बलिदान दिन.

दादाजी नाईक व लक्ष्मीबाई नाईक यांच्या पोटी उमाजी नाईक यांचा जन्म भिवडी, तालुका - पुरंदर, जिल्हा - पुणे येथे झाला. रामोशी जमातीत जन्मलेल्या उमाजी यांचा चोरी करने हा परंपरागत व्यवसाय होता. एका चोरीत ब्रिटीशानी त्यांना अटक केली त्यात त्यांना १ वर्षाची शिक्षा झाली. या काळात त्याना ब्रिटीशानी देशात चलाविलेली लूट, देशीय बांधवानवर होणारे अत्याचार यांविषयी उलगडा झाला व यापुढे ब्रिटिश सत्तेला विरोध हे आपले जीवन धेय त्यानी निश्चित केले. यासाठी त्यानी सशस्त्र क्रांति करण्याचा निर्णय घेतला.

तुरुंगातून बाहेर येताच त्यानी आपल्या जमातीतील लोकांना आपला विचार सांगून या लढ्यात सामिल करून घेतले. त्यांनी गनिमिकाव्याचा योग्य वापर करून ब्रिटीशानवर हल्ले सुरु केले. ब्रिटिशांचा खजिना लुटून , त्यांना ठार करण्याचा सपाटाच लावला.

लुटलेला पैसा लोकांमधे वाटुन, आड़ल्या-नडलेल्याना मदत करून त्यानी लोकांमधे विश्वास संपादन केला. त्याकारणाने ब्रिटीशानी त्यांचावर त्याकाळी ५०००/- चे ईनाम ठेवून ही कोणी उमाजीनच्या ठाव ठिकाणची माहिती देण्यास पुढे आला नाही.

पुढे त्यानी स्वत:ला राज्याभिषेक करून घेवुन नविन सरकार स्थापन झाल्याचे जाहिर करून स्वत:चा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्या द्वारे त्यांनी जनतेला ब्रिटीशान विरुद्ध उठाव करण्याचा आदेश दिला व जो यात सक्रिय सहभाग घेवुन ब्रिटीशानचा जास्तीत जास्त विध्वंस करेल त्याना नव्या सरकारद्वारे इनामे, जहागी-या, बक्षिसे देण्यात येईल असे जाहिर केले.

उमाजिंचा वाढता उपद्रव, ब्रिटीशान विरोधी वाढत्या करवाया याने हादरून जावून ब्रिटिशांनी त्यांना पकडण्याचा चंग बांधला व या वेळेस त्यांच्या प्रयत्नाना यश येवून फंद-फितुरिने उमाजीना
१५ डिसेम्बर १८३१ रोजी पकडण्यात आले. कडेकोट बंदोबस्तात त्याना सासवड येथे आणन्यात आले. तेथे त्यांचावर राजद्रोह आणि इंग्रज शिपाई, अधिकारीना ठार मारण्याचा आरोप ठेवून खटला भरण्यात आला व या खटल्याचा निकल लगेच देवून त्याना फाशीची शिक्षा देण्यात आली.

३ फेब्रुवारी १८३४ रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी पुण्यात उमाजीना फाशी देण्यात आ

Thursday, 19 January 2012

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड



"रायगड"

किल्ल्याची उंची : २९०० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः पुणे
जिल्हा : रायगड
श्रेणी : सोपी
महाडच्या उत्तरेस २५ कि. मी. वर हा किल्ला असून याची समुद्रसपाटी पासूनची उंची २८५१ फूट आहे. रायगड हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्रेयाला आकाश स्वच्छ असेल तर राजगड, तोरणा दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो.
रायगडपासून मुंबई, पुणे, सातारा ही शहरे सारख्याच अंतरावर आहेत. सह्याद्रीतील किल्ल्यांच्या रांगांतील हा एक दुवा आहे. रायगड हा निसर्गतःच डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे (तसेच) शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा यासाठी पुणे सोडून पश्चिम डोंगरात रायगड ही राजधानी महाराजानी निवडली.
इतिहास

रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दर्‍या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोर्‍यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूर कडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून
महारांजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते, ‘राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा’.
याच दुर्गदुर्गेश्र्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे.

१.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्विप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर १५.पूर्वेकडील जिब्राल्टर
शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना. ता. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकादि विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत ता. ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. ता. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी अश्र्िवन शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला. कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, ‘शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’ इ. स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व. ५ गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व. २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्र प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ‘ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’ पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७, इ. स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. इ. स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. ता. २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले.१५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२
फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठांनी घेतला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

१.पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायर्‍यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.

२.खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

३.नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध नाना फडणिसांशी लावला जातो ही पूर्णपणे गैरसमजूत आहे. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ. स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.

४.मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित्‌ दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्‍यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.

५.महादरवाजा : महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्‍या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विा व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवडा दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.

६.चोरदिंडी : महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायर्‍या आहेत.

७.हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणार्‍या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.

८.गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थेयाच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.

९.स्तंभ :गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्र्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.

१०.पालखी दरवाजा : स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायर्‍या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.

११.मेणा दरवाजा : पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.

१२.राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.

१३. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

१४.राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’

१५.नगारखाना : सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायर्‍या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.

१६.बाजारपेठ : नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरून आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.

१७.शिर्काई देऊळ : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता.

१८.जगदीश्र्वर मंदिर : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्र्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्‍याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायर्‍यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणेः-

श्री गणपतये नमः।

प्रासादो जगदीश्र्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः।

शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत
्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ॥१॥

वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते।

श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावधन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते॥२॥

याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्र्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’

१९.महाराजांची समाधी : मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्र्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिर्‍याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्र इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ. स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.

२०.कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.

२१.वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.

२२.टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी

२३.हिरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या मार्‍यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.
गडावर जाण्याच्या वाटा :

मुंबई – गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून : मुंबई – गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बसेस सुटतात. तसेच बस स्थानका बाहेरून जीपगाडाही जातात. बसने आल्यावर चित्‌ दरवाज्यापाशी, (जो आता अस्तित्वात नाही) जिथे पायर्‍या सुरू होतात तेथे उतरून पायर्‍यांनी गडावर जाता येते. जवळजवळ १५०० पायर्‍या चढून गेल्यावर महादरवाजातून आपला गडात प्रवेश होतो.

नाना दरवाजाकडूनही : नाना दरवाजाकडूनही आपण गड चढू शकतो. पायर्‍यांकडून जो डांबरी रस्ता पुढे जातो त्या रस्त्याने थोडे पुढे जाऊन उजवीकडे एक पायवाट जाते. त्या वाटेने गेल्यास नानादरवाजाने आपण गड चढू शकतो.

रोप-वे : आता गडावर जाण्यासाठी रोप-वेची व्यवस्था झाल्याने पायथ्यापासून १० ते १५ मिनिटांत आपण गडावर पोहचू शकतो.

राहण्याची सोय : रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेमध्ये राहण्यासाठी खोल्या उपलब्ध आहेत. तसेच एम.टी.डी.सी. च्या बंगल्यांमध्ये किंवा डॉरमिटरी हॉलमध्ये राह्ण्याची सोय होऊ शकते. रायगड जिल्हा परिषद, तालुका महाड, जिल्हा रायगड अथवा महाराष्ट्र राज्य पर्यटन केंद्र,संपर्क केल्यास राहण्याची सोय होऊ शकेल.

पाण्याची सोय : बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

Thursday, 12 January 2012

श्री तुळजापूर निवासिनी जगदंबा भवानी:



मार्गशीष गुरुवार विशेष :-

श्री श्री श्री तुळजापूर निवासिनी जगदंबा भवानी:

महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठां पैकी एक तुळजापूरची जगदंबा भवानी, देवीच्या एकूण ५१ शक्तीपीठां पैकी एक आहे. शिवाय, त्या ५१ शक्तीपीठां मधल्या भारताच्या ८ प्रमुख पीठां मधील एक आहे.

कथा:

फार पूर्वी सत्ययुगात कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती ही पार्वती मातेची निस्सीम भक्त होती. कर्दम ऋषी तपश्चर्येला गेल्यावर अनुभूती पण तपाला बसली व आदी शक्ती पार्वतीची आराधना करू लागली. ते ठिकाण होते यामुनाचल म्हणजे हल्लीचे बालेघाट परिसर.

एकदा तिथून द्रविड देशाचा (दक्षिण भारत) कुक्कुर नावाचा राक्षस राजा चालला होता. त्याने अनुभूतीला पाहिल्यावर तिचे रूप पाहून तो तिला स्वतः बरोबर चालण्या विषयी सांगू लागला. तेव्हा, अनुभूतीने प्रतिकार करून आपण कर्दम ऋषीची पत्नी असून सध्या तपश्चर्या करीत असल्याचे म्हटले, तेव्हा राक्षस तिला बळजबरीने नेऊ लागला. अनुभूतीने देवी पार्वतीचा धावा सुरु करताच ती भवानी प्रकट झाली व कुक्कुर राक्षसाशी युध्द करून त्याला सैन्य सह ठार केले.

अनुभूतीच्या विनंतीवरून देवी भवानी बालेघाटाच्या परिसरात राहू लागली. ती त्वरेने म्हणजे वेळ न घालवता आपल्या भक्तिणी साठी धुवून आली, म्हणून ऋषीमुनी तिला "त्वरिता" म्हणू लागले. व त्या क्षेत्राला "त्वरीतापूर" त्याच त्वरीताचे पुढे, तुरीता, तुरजा असे अपभ्रंश होत "तुळजा" झाले. इथे ती जगदंबा पार्वती साक्षात पूर्ण रुपाने वसलेली आहे. ती चौदा भूवानांची स्वामिनी असल्यामुळे तिला "भवानी" असे म्हटले जाते.

पुढे, दक्षिणेत महिषासुर नावाचा दैत्य मातला. त्याने, इंद्रादी देवांचा पराभव केला, तेव्हा सर्व देवांनी श्री विष्णू व श्री शिवा च्या सल्ल्याने देवी भवानीची त्वरीतापूर येथे आवाहन केले. तेव्हा ती जगदंबा प्रकट होवून, महिषासुराचा लवकरच वध होईल असे म्हणली. ती सिंहावर आरूढ होवून बसली असता महिषासुराचा सेनापती चीकासुराची नजर तिच्यावर पडली व त्याने महिषासुराला तिचे सौंदर्याचे वर्णन सांगून राणी बनवण्यास योग्य आहे असे सांगितले. तेव्हा महिषासुराने तिला घेऊन ये असे फार्मावता, चीकासुरने तिच्या जवळ येऊन महिषासुराचा निरोप सांगितला.

तेव्हा देवीने "जो युद्धात मजाह पराभव करील, त्याच्याशी मी विवाह करीन" असे म्हटले. हे ऐकून महिषासुरने आपले सैन्य देऊन चीकासुराला पाठवले असता, देवीच्या अंगातून "अंबिका" देवी प्रकट झाली व तिने चीकासुराचा नाश केला. असे होता होता ९ दिवसात शुंभ निशुम्भ, रक्तबीज इत्यादी राक्षस नायक देवीच्या महाकाळी , कालरात्री, दुर्गा या अवतारांनी मारून टाकले. दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा स्वतः १८ भुजांचे रूप धारण करून वध केला. तेव्हा पासून तुळजा भवानीला "महिषासुर मर्दिनी" असे म्हटले जाते. हीच देवी पुढे दमल्यामुळे सप्तश्रुंग म्हणजे सात शिखरे असलेल्या पर्वतावर विश्रांती साठी गेली. तेव्हा पासून तिला "सप्तशृंगी" म्हणू लागले.

पुढे देवीने मातंग नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून तुळजा भवानीला "मातंगी" म्हणू लागले. परशुराम अवतारच्या वेळी श्री विष्णूचे तेज कोणाला सहन होईना म्हणून शंकराने जमदग्नी ऋषीचे तर देवी भवानीने "रेणुका" रूप घेऊन जन्म घेतला व श्री विष्णूच्या परशुराम अवतारला जन्म दिला. तेव्हा पासून शिव शंकराला जगदपिता व देवी पार्वतीला जगद्माता म्हणू लागले.

अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी देवीची मूर्ती कदम पुजाऱ्यांनी लपवून ठेवली आणि दुसरी दुय्यम मूर्ती पुढे केली. ती दुय्यम मूर्ती अफझलखानाने खंडीत केली. तेव्हा देवीने "तुझा मृत्यू १५ दिवसात शिवाजी च्या हातून होईल" अशी गर्जना आसमंतात घुमली. पुढे जेव्हा शिवाजी महाराजांना कदम पुजाऱ्याचा पराक्रम कळला, तेव्हा ते खुश झाले. तेव्हा पासून कर्दम ऋषी आणि अनुभूती चे वंशज असलेल्या कदम पुजार्याना छत्रपती शिवाजी महाराज यांनी सनद दिली.

देवीला राजेंनी राज्याभिषेका अगोदर अमूल्य दागिने, जड जवाहीर व दहा हजार होण खर्च लागू केला. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेक झाल्यावर सोन्या चांदीचे शिक्के मंदिराच्या गाभार्यात ठोकले व दर महा १०००० होण खर्च दिला.

Wednesday, 11 January 2012

बातमी

गाडी चालवताना मोबाइलवर बोलताना ट्राफिकमामाने पकडले तर, आतापर्यंत फारफार तर दंडाची पावती घेऊन सुटका होत होती. पण कदाचित पुढे हे साहस चांगलेच महागात पडू शकेल. कारण मोबाइलवर बोलताना पकडले, तर थेट तुमचे लायसन्स पाच वर्षासाठी रद्द करावे, असे सुचविण्यात आले आहे.ड्रायव्हिंग करताना मोबाइलवर बोलण्याच्या मोहापायी होणारे अपघात वाढत आहेत. गेल्या वर्षभरात १९ हजार ४६२ जणांना मोबाइलवर बोलताना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल करण्यात आला. पण यामुळे अपघाताची वाढती शक्यता लक्षात घेऊन मोटार वाहन कायद्यात कठोर बदल करण्यात यावेत, असे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत.
अनिल गायकवाड

Saturday, 7 January 2012

हसा थोडस

***"दोन वाईट गोष्टींमधून एक निवडायची वेळ आल्यास अशी गोष्ट निवडा जी तुम्ही पूर्वी करून पाहिली नाही." ***
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
"
ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे
याचा विचार करण्यात वेळ न घालवता,
ग्लास रिकामा झाल्यावर धुणार कोण याचा विचार करावा."
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
*
लहानपणी खेळांविषयी प्रेम असतं तर.........
तारुण्यात प्रेमाचे खेळ सुरू होतात...
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
आपली वडीलधारी मंडळी किती चलाख आहेत
आम्हाला ते शिकवतात की ,
'
प्रत्येक स्त्रीला मातेसमान माना '
ठिक आहे
यामुळे आपली नीतीमत्ता सुधारेल
पण
आपल्या वडीलांची बिघडेल त्याचं काय ?
- आचार्य अत्रे
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलायं, काही कल्पना आहे का?...
....
अहो, आपल्या स्वयंसिद्ध बापुंचं प्रवचन सुरु असताना भक्तगणांमधला एकजण चक्क
आरामात सिगरेट ओढत होता... हे दृश्य पाहुन मला एवढा धक्का बसला की हातातला
बिअरचा कॅन निसटून खाली पडला!!!
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
* '
सदैव' आणि 'कधीच नाही'
हे शब्द कधीच वापरू नयेत हे सदैव लक्षात ठेवा.
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
* पहिले चाक ज्याने शोधून काढले, त्याचे एवढे कौतुक कशाला? इतर तीन ज्यांनी
शोधली, ते खरे कौतुकाला पात्र आहेत!!!!
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
* माणसांचीही गंमत असते पाहा. तुम्ही एखाद्या माणसाला सांगा, आकाशगंगेत ३००
अब्ज तारे आहेत.... तो चटकन विश्वास ठेवतो. पण, पार्कातल्या बेंचला नुकताच रंग
लावलाय, तो ओला आहे असं सांगा..... तो स्वत: हात लावून बोटं बरबटवून खात्री करून
घेतल्याशिवाय राहात नाही!!!!
*----------- --------- ------------ --------- --------- ------------ -------
का? का? का?
१. पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का
असतात?
२. स्टेडियममध्ये जिथे प्रेक्षक 'बसतात' त्या जागेला 'स्टँड' का म्हणतात?
३. जगात सर्वांना स्वर्गात जायचं असतं, पण मरायचं कुणालाच नसतं, असं का?
४. बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का? नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना
पहिली चाल का *
*99
वर्षांची म्हातारी जेव्हा 'हच का नया लाइफटाइम रिचार्ज' घेते!
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
आपली चूक असताना जो माफी मागतो, तो प्रामाणिक असतो.
आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.
आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!!
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
जुनी मोटर कार खरेदी करावयाची असल्यास , तिची योग्य किंमत ठरविण्याची पद्धत
जी कार आवडेल ती दोन तास ट्रायलसाठी मागून घ्यावी व अशाच दुसर्‍या जुन्या
गाड्यांच्या डिलरकडे घेऊन जावी. त्याला सांगावं की , तुम्हाला ही गाडी विकायची
आहे. किती किंमत येईल ?
तो सांगेल ती किंमत गाडीची खरी किंमत !
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
तुम्ही बरोबर असता तेव्हा कोणी तुम्हाला लक्षात ठेवत नाही,
तुम्ही चुकता तेव्हा कोणी तुम्हाला विसरत नाही ....
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
प्रोफेसर विसराळू का असतात याचं कारण एका प्रोफेसरांनीच शोधून काढलं. परंतु
नंतर ते कारण प्रोफेसर विसरून गेले.
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड
पुरवणं अशक्य व्हावं!!!
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते, असा एक सुंदर
सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का?
जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!
------------ --------- --------- --------- --------- --------- --------- ---
नकार देणे ही कला असेल. पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे.
------------ --------- ------------ --------- --------- ------------ ------
मार्क ट्वेन हा अतिशय बुद्धिमान आणि खोचक विनोद करणारा लेखक होऊन गेला.
त्याची काही निरिक्षणे जगप्रसिद्ध आहेत.
त्याचा हा सर्वांगसुंदर विनोद
"
जेंव्हा एक तरुणी एका तरुणाच्या हृदयावर डोके ठेवते ;
तेव्हा मला फ़ार गंमत वाटते .
त्याला हृदय नसतं ;
आणि
तिला डोके नसतं ....." *
उमेश प्रभाले यांच्या सौजन्याने

© 2011 Lane 46 |  ©Blogger templates by Ourblogtemplates.com| Please come again

Back to TOP