
सदाबहार अभिनेते देव आनंद यांचे लंडन येथे निधन झाले . आपल्या नवकेतन फिल्म्स तर्फे ३५ एकापेक्षा एक सुंदर सिनेमांची निर्मिती करून देव साहेबांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते इ.स. १९४६ साली देव आनंद यांच्या कारकिर्दीला 'हम एक है' या चित्रपटाने सुरवात झाली. इ.स. १९४९ मध्ये त्यांनी नवकेतन फिल्म कंपनी बनवली आणि ३५ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर गेली अनेक दशके त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला.
गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. हम दोनो, अमीर गरीब, गाईड, पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस हे आणि असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठा ना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दो आंचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली.
संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणार्या त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपटरसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे हॉलिवुड चित्रपटसृष्टीतील ग्रेगरी पेक या अभिनेत्याशी तुलना केली जाई.
देव साहेबांचे वाढलेले वय त्यांनी कधीच मान्य केले नाही परंतु देव साहेबांनी अनेक नवीन चेहरे आपल्या सिनेमात घेऊन त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले
अशा देव आनंद यांना हिंदू खाटिक समाज बांधव संघटने तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
देव आनंद यांची चिरतरुण गाणी:
Tu kaha Yea Bata:
Mein Zindagi Ka Saath:
O Jiya o Jiya Kuch Bol Do:
1 comment:
good
Post a Comment