अर्धा तास अगोदरच मी स्टेशनवर होतो
गर्दीत त्या साऱ्या तो चेहरा शोधत होतो
ती सुद्धा आली अगदी ठरल्याप्रमाणे
जवळ ती असण्याची मग सवय करीत होतो
आज सार काही ... पहिल्यांदाच घडत होत
आज एक नात ... हळुवार उलगडत होत
ती आली पुढे थोडी लाजत थोडी बुजत
ती आली पुढे थोडी पदर जरा सावरत
ती आली पुढे थोडी नजर हळूच चोरत
ती आली पुढे थोडी गालात गोड हसत
आज सार काही ... थांबत बावरत होत
आज एक नात ... हळुवार उलगडत होत
नंतर तिच्या ओठांतला शब्द कळला मला
नंतर तिच्या डोळ्यांतला भाव कळला मला
नंतर तिच्या हाताचा स्पर्श झाला मला
नंतर तिच्या स्पर्शाचा कैफ चढला मला
आज सार काही ... धुंद गंधित होत
आज एक नात ... हळुवार उलगडत होत
आज कळल मला ती जवळ म्हणजे काय
आज कळल मला ती दूर म्हणजे काय
आज कळल मला हे बंध म्हणजे काय
आज कळल मला ते प्रेम म्हणजे काय
आज सार काही ... पुन्हा पुन्हा हव होत
आज एक नात ... हळुवार उलगडत होत
लग्ना अगोदर ती पहिली भेट होती
Engagement ची हुरहूर अजून मनात होती
थोडी भीती थोडी अनाम ओढ होती
अनोळखी त्या सांजेची नवी ओळख होती
आज सार काही ... नव नव जग होत
आज एक नात ... हळुवार उलगडत होत
No comments:
Post a Comment