राजे तुमच्या स्वराज्याची साद आम्हाला एकुच येत नाही कारण धर्माचा अन जातीचा वाद सोडून आम्हाला काहीच सुचत नाही तुम्ही स्वराज्य घडवला ... ... ताठ मानेनं जगण्यासाठी मराठी माणसाला वावरण्यासाठी पण राजे आम्ही आज मराठी विसरलोत ती केवळ इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही गडकिल्ले उभारले आमच्या रक्षणासाठी पण राजे आम्ही निर्लज्ज हो राजे आम्ही निर्लज्ज ज्यांनी ते वापरले पोरींना फिरवण्यासाठी आजही मावळे देतायत लढा, करतायत आंदोलन त्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी, आम्हीही आलो असतो राजे पण वेळ कमी पडतो पिक्चर पाहण्यासाठी, राजे पैसे आहेत माझ्याकडे तिला हॉटेलात नेण्यासाठी पण शंभर रुपये नाहीत ते तुम्हाला हार घालण्यासाठी राजे १००० रुपये भेटतात मला एका मतासाठी मग का करू चांगले काम फुकट एनर्जी घालवण्यासाठी राजे तुम्ही आयुष्य खर्ची घातले आमच्यासाठी आणि आम्ही षंढ झालोत राजे स्वतःसाठी स्वाभिमान आमच्यात उरलाच नाही नाही ताकत हात उचलण्यासाठी नुसतेच जगत आहो फ्युचर साठी नुसतेच जगत आहो फ्युचर साठी....
No comments:
Post a Comment